पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी मांडले फडणवीसांविरूद्ध ”हे” ठळक मुद्दे

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर आज महाविकास आघाडीच्या अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आभासी निवेदनाला आम्ही प्रत्यक्ष उत्तर दिले आहे. प्रत्यक्षदर्शी उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकार वर टीकास्त्र सोडले.

 मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर आज महाविकास आघाडीच्या अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन  आभासी निवेदनाला आम्ही प्रत्यक्ष उत्तर दिले आहे. प्रत्यक्षदर्शी उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकार वर टीकास्त्र सोडले. 

महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले
यात केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या १७५० कोटी चे  महाराष्ट्राला गहू मिळालेले नाहीत.  १२२ कोटी स्थलांतरित मजुरांना निधी  देखील मिळालेला नाही. याबाबत त्यांनी सांगितले. 
६८ कोटी रुपयांचा ट्रेन चा खर्च स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे.  त्यातील ८० ट्रेन केंद्र सरकारकडून मागवलेले असताना फक्त ३० ट्रेन केंद्र सरकारने दिलेले आहेत. खर्चाबाबत विचारणा करताना  एक ट्रेन ला ५० कोटींचा खर्च कसा येतो ?  असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ट्रेन बद्दल होत असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत बोलताना महाराष्ट्रात श्रमिक ट्रेन मिळत नाहीत. तसेच  एका तासाच्या अवधीत ट्रेन ची वेळ सांगतात. जाणीवपूर्वक प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण करतात. असे करून सरकारला बदनाम करण्याचे काम चालू आहे. 
तसेच १९,००० कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला मिळाले असे बोलले पण तसे नसून  १८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नाही असे देखील त्यांनी सांगितले.  केंद्र सरकारने जी.एस.टी. चे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे अजूनही दिलेले नाही.  पियुष गोयल याबाबत फक्त ट्विटरवरून घोषणा करतात प्रत्यक्षात काहीही करत नाहीत. त्यामुळे  कायद्यात बसणारे पैसे तरी  महाराष्ट्र सरकारला मिळाले पाहिजेत. तर  महाराष्ट्राचे केंद्राकडे  ४२ हजार कोटी थकीत आहेत.  महात्मा फुले योजनेअंतर्गत १२  हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटले गेले. 
अशा विविध मुद्यांवर हात घालून अनिल परब यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.