संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर, नाना पटोले म्हणाले की…

महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतं. या सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेलं आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. म्हणून आम्ही त्या भेटीला राजकीय भेट असं गृहीत धरत नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यात बैठक झाल्याचं समोर आल्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. आता गुप्त बैठकीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

    नेमकं काय म्हणाले पटोले?

    महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतं. या सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेलं आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. म्हणून आम्ही त्या भेटीला राजकीय भेट असं गृहीत धरत नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. भाजपचे नेते भविष्यवाले आहेत. मी भविष्यवाला नाही, असं म्हणत भाजपच्या निशाणा साधला. येत्या सोमवारपासून आधिवेशन सुरु होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड लवकर व्हावी असं महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला वाटतं. उद्या सर्वांची कोरोना चाचणी होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

    तसेचं अध्यक्षपदासाठी सर्व आमदारांमध्ये चर्चा केली जाईल. त्यानंतर हे नाव पुन्हा हायकमांडकडे पाठवले जाईल. आमच्या पक्षात लोकशाही आहे. भाजपसारखी ठोकशाही नाही, असंही नाना पटोले म्हणाले.