प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही कार तिथे कोणी ठेवली होती, हे कोडे अद्याप उलगडलेले नसतानाच, शुक्रवारी त्या कारचे मालक मनुसख हिरेन यांची मृतदेह मुंब्रा खाडीत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी ATS ने धक्कादायक खुलासा केला आहे. ATS ने मांडलेले पाच मोठे मुद्दे कोड्यात टाकणारे आहेत. ATS ने केलेल्या खुलाशामुळे हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे.

  मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही कार तिथे कोणी ठेवली होती, हे कोडे अद्याप उलगडलेले नसतानाच, शुक्रवारी त्या कारचे मालक मनुसख हिरेन यांची मृतदेह मुंब्रा खाडीत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी ATS ने धक्कादायक खुलासा केला आहे. ATS ने मांडलेले पाच मोठे मुद्दे कोड्यात टाकणारे आहेत. ATS ने केलेल्या खुलाशामुळे हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय बळावला आहे.

  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली होती, ती चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. मनसुख हिरेन या कारचे मालक होते. त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा शुक्रवारी अचानक मृतदेह आढळल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले.

  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला. ATS ने आपल्या प्राथमिक तपास अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

  ATS ने मांडलेला मुद्दा नंबर १

  मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत असल्याचे तपासाता समोर आले आहे. मृत्यूच्या अगोदर ३० मिनिटे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करण्यात आले. एका मोबाईचं लोकेशन वसईतलं मांडवी तर एकाचं लोकेशन तुंगारेश्वर येथे दाखवले जात आहे. या दोन्ही ठिकाणांचं अंतर साधारण ८ ते १० किमी इतक आहे. त्यांचा मृत्यू त्यांचे दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी झाला असावा असा एटीएसला संशय आहे.

  ATS ने मांडलेला मुद्दा नंबर २

  हिरेन यांच्या तोंडात रुमाल कोंबला होता. आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाल्याचा सशय बळावतो आहे, असं एटीएसच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

  ATS ने मांडलेला मुद्दा नंबर ३

  हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे कोंबण्यात आले होते. तोंडावाटे त्यांच्या शरीरात पाणी जाऊ नये म्हणून तोंडात रुमाल कोंबण्यात आल्याचा संशय आहे. जर, तोंडात पाणी गेलं असतं तर काही वेळातच त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगला असता. उशीरा त्यांच्या शरीरात पाणी जावं आणि मृतदेह जास्त काळ त्यांचा पाण्यात रहावा जेणेकरुन मारेकऱ्यांना पळण्यास जास्त वेळ लागेल आणि पुरावेही नष्ट करण्यास वेळ मिळावा या हेतून हे सर्व करण्यात आल्याचा ATS ला संशय आहे.

  ATS ने मांडलेला मुद्दा नंबर ४

  हिरेन यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याआधी १२ ते १६ तास आधीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा एटीएसला सगळ्यात मोठा संशय आहे. तसंच ज्या ठिकाणी त्यांचा मृतहेद मिळाला तिथे तो काही तास अगोदर फेकण्यात आला असावा असा अंदाज आहे.

  ATS ने मांडलेला मुद्दा नंबर ५

  हिरेन यांना अगोदर मारण्यात आलं असावं आणि त्यानंतर त्यांचा मृतहेद मुंब्र्याच्या रेतीबंदर येथे फेकून देण्यात आला असावा. दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचं तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय ATS ला आहे.