sameer wankhede

एनसीबीचे(ncb) तपास अधिकारी समीर वानखेडे(attack on sameer wankhede) तसेच इतर कर्मचाऱ्यांवर  गोरेगावमध्ये हल्ला करण्यात आला आहे.

एनसीबीचे(ncb) तपास अधिकारी समीर वानखेडे(attack on sameer wankhede) तसेच इतर कर्मचाऱ्यांवर  गोरेगावमध्ये हल्ला करण्यात आला आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. ड्रग्ज पेडलर्सनी हा हल्ला काल रात्री केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक (three people arrested)करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. आता वानखेडेंसह त्यांच्या टीमवर हल्ला झाला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात समीर वानखेडेंसह एकजण जखमी झाला आहे. समीर वानखेडे पाच जणांच्या टीमसह ड्रग पेडलर कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास ते गेले होते. कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे.