anil deshmukh

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट रचला गेला होता. या कटात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये एक अतिवरिष्ठ महिला अधिकारीचाही समावेश आहे. परंतु या कटाचा प्रकार लक्षात आल्यावर त्याला वेळीच उधळून टाकला आहे. असे देशमुख यांनी सांगितले.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Home Minister)  यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट (big secret blast of Home Minister)  केला आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) पाडण्याचा प्रयत्न (Attempt) काही पोलिस अधिकाऱ्यांनीच (police officers ) केला होता. परंतु तो अल्पावधीतच हाणून पाडला आहे. असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट रचला गेला होता. या कटात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये एक अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. परंतु या कटाचा प्रकार लक्षात आल्यावर त्याला वेळीच उधळून टाकला आहे. असे देशमुख यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात चर्चा झाली. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लावले गेले. असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील काही अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकाऱ्यांना आजही महत्त्वाची पदं दिली आहेत.

गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, फडणवीस हे लहान लहान कामांसाठी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याकडे जातात. फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी राजभवनामध्ये एखादी खोली घ्यावी, जेणेकरुन त्यांचा ये-जा करण्याचा त्रास वाचेल. असा टोला देशमुख यांनी फडणवीस यांना लगावला आहे. तर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कंगनाबाबत विचारल्यावर त्यांनी या प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला.