मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न : खासदार संजय राऊत

२० जिलेटीनच्या कांड्या त्या मोजल्या तेव्हा साडेएकोणीसच होत्या. २० जिलेटीनच्या कांड्यांसाठी राष्ट्रीय तपास पथक ज्या पद्धतीने मुंबईत आलं आणि तपास केला. त्यांना दहशतवाद्यांचा तपास करायचा होता की फक्त सचिन वाझे यांसारख्या मुंबई पोलिसातल्या एका अधिकाऱ्याला तुरूंगात टाकून आपला राजकीय हिशोब पूर्ण करायचा होता. अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी  राष्ट्रीय तपास संस्थेने  रात्री उशीरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना याप्रकणी अटक केली आहे. त्यानंतर आज (रविवार) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

    मुंबई पोलिसांची क्षमता जगाने मान्य केली आहे. पुन्हा एकदा त्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दहशतवाद विरोधी पथकाकडे दिला. एटीएसने आतापर्यंत फक्त मुंबई आणि राज्य नाहीतर देशातील अनेक प्रकारणांचा तपास केला. लोकांना फासापर्यंत चढवलं. हेच ते पोलीस दल आहे. ज्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या मालिकेचा तपास केला आणि २६/११ सारखा दहशतवादी हल्ला परतवून लावला. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.