अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढायचा असल्यानेच लॉकडाऊनचे निर्बंध टाकण्याचा प्रयत्न 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी राज्य सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढायचा असल्यानेच  लॉकडाऊन व निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.  कोरोनाच्या नावाखाली सरकारला काहीच करायचे नसावे म्हणून तसाच वेळ काढून घेण्याचा अधिवेशनात प्रयत्न होणार आहे असा खरपूस समाचार त्यांनी माध्यमांशी बोलताना घेतला आहे.

    मुंबई (Mumbai).  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी राज्य सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढायचा असल्यानेच  लॉकडाऊन व निर्बंध टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.  कोरोनाच्या नावाखाली सरकारला काहीच करायचे नसावे म्हणून तसाच वेळ काढून घेण्याचा अधिवेशनात प्रयत्न होणार आहे असा खरपूस समाचार त्यांनी माध्यमांशी बोलताना घेतला आहे.

    सर्व क्षेत्रांत अस्थिरता (Instability in all regions)
    दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये आज अस्थिरता निर्माण झाली आहे.  वीज खंडित झाल्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे त्यामुळे आंदोलन करत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.  त्यातच सरकारच्या अपु-याउपाय योजनांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

    प्रत्येक घटकांत असंतोष (Dissatisfaction with each component)
    महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे राहिले आहेत, त्याच्यासंदर्भात समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे तो आंदोलन, मोर्चाच्या मार्फत बाहेर येत आहे.  त्यात शिक्षकांचे आंदोलन, शुल्कवाढी विरोधात पालकांचे आंदोलन, मराठा समाजाचे आंदोलन असेल हे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील अशी भिती राज्य सरकारला आहे.  त्यामुळे राज्यसरकार पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, त्यामुळेच लॉकडाऊन आणि व निर्बंध टाकण्याचा प्रयत्न करत  कोरोनाच्या नावाखाली काहीच करायला नको असा सरकारचा प्रयत्न दिसतो त्यामुळे त्या निमित्ताने वेळ काढून घेण्याचा अधिवेशनात प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला.