Attempted to board a running train and ... RPF jawan's alert saved the life of a pregnant woman Dadar's video goes viral after Wangani

वांगणी रेल्वेस्थानकावर एका अंध महिलेच्या मुलीला आपल्या जीवावर उदार होत वाचवणाऱ्या मयुर शेळकेनंतर आता पुन्हा एकदा एका आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचे प्राण वाचले आहे. ही घटना सोमवारी दादर रेल्वेस्थानकावर घडली.

    मुंबई : वांगणी रेल्वेस्थानकावर एका अंध महिलेच्या मुलीला आपल्या जीवावर उदार होत वाचवणाऱ्या मयुर शेळकेनंतर आता पुन्हा एकदा एका आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचे प्राण वाचले आहे. ही घटना सोमवारी दादर रेल्वेस्थानकावर घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, एक गर्भवती महिला चालल्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. दादर फलाट क्रमांक ५ वर ट्रेन नंबर ०१०९१ सीएसएमटी­-दानापूर विशेष गाडी आली होती. गाडी आपल्या गंतव्य स्थानाकडे रवाना होण्यासाठी सुरु झाली असता त्याचवेळी एक गर्भवती महिला शोभा कुमारी आपल्या छोट्या मुलासह चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल ढासळला. त्याचदरम्यान ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान अशोक यादव यांनी चपळाईने महिलेला उचलून ट्रेनपासून दूर केले, अन्यथा महिला रुळावर कोसळली असती. २० वर्षीय शोभा कुमारी दादरहून बिहारला आपल्या गावी जात होती. फलाटावर उशीरा पोहचल्याने गाडी वेळेवर पकडता आली नाही.

    काही दिवसांपूर्वी पॉईंटमन मयुर शेळके यांनी वांगणीत एका मुलीला वाचवले होते. ही घटना सोशल मीडिवायर चांगलीच व्हायरल झाली होती. आता दादरमधील हा व्हीडिओ देखील व्हायरल होत आहे. गर्भवती महिलेचे प्राण वाचवणाऱ्या अशोक यादव यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते.