वाहतूक पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न, चालकाने अंगावर घातला ट्रक

रोकडे यांनी ट्रक चालक राहुल दातीर याला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने पोलिस रोकडे यांच्याकडे रागाने पाहत ट्रक त्यांच्या अंगावर चालवत मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रक पुढे गेल्यावर पोलिसाने त्याचा पाठलाग केलाय यावेळी पुन्हा चालकाने दुचाकीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : वाहतूक पोलिसाने (traffic police) एका ट्रक (truck) चालकाला (driver) ट्रक थांबवण्याकरिता इशारा केला परंतु चालकाने पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याचा प्रयत्न (Attempting to kill) केला आहे. अशी धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गावर घडली आहे. पोलीस शिपाई शंकर हिरामण रोकडे (३५) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रक चालक राहुल अशोक दातीर याच्या विरोधात खुनाच्या तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर रोकडे हे रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास मोशी येथील भारत माता चौकात वाहतूक नियमनाचे काम करत होते.

त्यावेळी एक आयशर ट्रक आला. रोकडे यांनी ट्रक चालक राहुल दातीर याला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने पोलिस रोकडे यांच्याकडे रागाने पाहत ट्रक त्यांच्या अंगावर चालवत मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रक पुढे गेल्यावर पोलिसाने त्याचा पाठलाग केलाय यावेळी पुन्हा चालकाने दुचाकीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.