अजंठा एलोरा लेणी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
अजंठा एलोरा लेणी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा या बौद्ध लेणींचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार आज केला आहे. औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे.

मुंबई (Mumbai).  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा या बौद्ध लेणींचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार आज केला आहे. औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे.

औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असून आमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही.त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याची माहिती पुढे आल्या नंतर ना. रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र औरंगाबाद मध्ये जागतिक स्तरावर नावलौकिक असणाऱ्या बौद्ध संस्कृतीच्या अजंठा आणि एलोरा या प्राचीन लेणी आहेत.जगभरातून अजंठा एलोरा लेणी पाहण्यासाठी पर्यटक औरंगाबादला येतात.

आठ जागतिक आश्चर्यांपैकी एक असणारे अजंठा एलोरा लेणी चे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. शांतता अहिंसा प्रज्ञा शील करुणा सत्य या बौद्ध संस्कृतीच्या तत्वांच्या अजंठा एलोरा या लेणी प्रतीक आहेत. जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या अजंठा एलोरा बौद्ध लेणींचे नाव औरंगाबाद विमानतळाला द्यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.