Shiv Sena forgets tax waiver promise; BMC will recover property tax

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. काँग्रसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगजेब सेक्युलर नव्हता असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच नामांतर वादावर थेट जाहीर भूमिका मांडली आहे.

मुंबई : औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. काँग्रसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगजेब सेक्युलर नव्हता असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच नामांतर वादावर थेट जाहीर भूमिका मांडली आहे.

महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत थोरातांनी नामांतरचा विरोध स्पष्टपणे जाहीर केला. मात्र, या नंतरही शिवसेनेकडून शासकीय पातळीवर संभाजीनगर असा उल्लेख होत राहिला आहे. याबाबत काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. यावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘वर्षानुवर्षं आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला होता’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस विरोधी भूमिका मांडली आहे. यामुळे येत्या काळात नामांतराचा वाद आणखी पेटम्याची शक्यता आहे.