‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे निलेश राणेंचा घणाघात

राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे आमदार राजू नवघरे हे त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले. त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. या अतिशय निंदनीय प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

    दरम्यान आता या प्रकरणावरुन नवघरे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे असं निलेश राणे म्हणाले आहेत.

    निलेश राणे नेमकं काय म्हणाले?