Authorities in the Delkar suicide case and the opposition in the Hiren murder case in the Legislative Assembly; Tahkub for the working day

मनसुख हिरेन या अंबानी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची संशयीत हत्या झाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून निलंबीत करा या मागणीसाठी आज विरोधीपक्षांनी विधानसभेत आक्रमकपणे मागणी केली. या मागणीच्या समर्थनासाठी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाच्या वेल मध्ये विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सत्ताधारी बाजूच्या सदस्यांकडूनही नारेबाजी आणि आरोप प्रत्यारोप करत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गदारोळामुळे कामकाज आठवेळा तहकूब झाले, त्यानंतर या मुद्यावरील गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

  मुंबई : दादरा नगर हवेली येथील सातवेळा खासदार झालेल्या मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मयत मनसुख हिरेन यांच्या हत्येला जबाबदार पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबीत करून अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची राज्य दहशतवाद विरोधी पथकामार्फत चौकशीची घोषणा केली. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे ते म्हणाले.

  सचिन वाझेना निलंबीत करा

  मनसुख हिरेन या अंबानी प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची संशयीत हत्या झाल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून निलंबीत करा या मागणीसाठी आज विरोधीपक्षांनी विधानसभेत आक्रमकपणे मागणी केली. या मागणीच्या समर्थनासाठी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाच्या वेल मध्ये विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सत्ताधारी बाजूच्या सदस्यांकडूनही नारेबाजी आणि आरोप प्रत्यारोप करत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गदारोळामुळे कामकाज आठवेळा तहकूब झाले, त्यानंतर या मुद्यावरील गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

  वाझे यांनी खून केला

  प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  मयत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या पोलीसांना देण्यात आलेल्या जबाबातील काही मजकूर वाचून दाखवला. त्यात सचिन वा झे यांनी आपल्या पतीला अंबानी प्रकरणात अटक व्हावे म्हणून दबाव आणल्याचे म्हटल्याचे तसेच वाझे यांनीच खून केल्याचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले.  फडणवीस म्हणाले की, चाळीस लाख रूपयांच्या  मिरा भाईंदर येथील जुन्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या धनंजय गावडे यांच्याकडे हिरेन यांचे शेवटचे लोकेशन सापडले आहे. तसेच वाझे आणि गावडे हे त्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे वाझे यांना कलम २०१ अन्वये तातडीने अटक करून चौकशी करावी अशी मागणी त्यानी केली. यावेळी भाजप सदस्य आक्रमक झाले त्यांना वेलमध्ये येवून आक्रमक पणे घोषणाबाजी सुरू केली.

  दोन्ही बाजूने घोषणाबाजी

  त्यावेळी संसदीय कार्यमंत्री ऍड अनिल परब यांनी यावेळी विरोधकांना प्रति आव्हान देत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात ज्या भाजपच्या नेत्यांची नावे आली आहेत त्यांच्यावर देखील अटक कतून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी दोन्ही बाजूने सदस्य वेलजवळ आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्याकडे डेलकर यांच्या सुसाईट नोटची प्रत आहे त्यात दादरा नगर हवेलीच्या प्रशासकाचा उल्लेख असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावेळी सदस्यांना कोविडचे नियम पाळावे तसेच जागेवर बसावे अशी सूचना केली.

  सिडीआर कशा मिळतात

  नाना पटोले यांनी यावेळी अंबानी यांच्या घराजवळ तिहेरी सुरक्षा असताना स्फोटकांची गाडी कशी पोहचली असा सवाल केला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलीसांकडील सिडीआर कशा मिळतात असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी आपल्याला याबाबत अधिकार आहे विरोधकांचा आवाज असा बंद करता येत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की याबाबत माझी चौकशी करा मी त्याला घाबरत नाही मात्र वाझे यांच्यावर कारवाई झालीच पाहीजे. यावेळी दोन्ही बाजूने नारेबाजी झाली. आणि कामकाज प्रथम दुपारी १२वाजून चौदा मिनिटांनी  तहकूब झाले. त्यानंतर सातत्याने कामकाज तहकूब करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीची घोषणा केली. ते म्हणाले की, मोहन डेलकर यांनी सुसाइड नोट मध्ये मुंबईत का आत्महत्या करत आहे? याचे कारण दिल्याचे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी रायपूर येथून राजेश कुमार या सनदी अधिका-याने नागपूरात येवून आत्महत्या केल्याचे ते म्हणाले.

  शाब्दिक चकमकी – नारेबाजी

  त्यानंतर विरोधकांनी वाझे यांची तातडीने निलंबीत करून अटक करावी आणि चौकशी करावी अशी आग्रही मागणी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाजूच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकी नारेबाजी आरोप प्रत्यारोप होत राहिले. त्यातच उर्वरीत कामकाज पुकारण्यात आले. यावेळी  शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली त्यामुळे वाझे यांच्यावर सुडबुध्दीने आरोप केले जात आहेत असा आरोप केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या प्रकणात देखील माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या सुसाइड नोट नुसार कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी देखील सरकारला आव्हान देत त्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केल्याचे सांगत आपण त्या प्रकरणातही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. या मुद्यावरील गदारोळ त्यानंतरही सुरूच होता. सभागृहात सन २०२१ – २२ या वर्षांच्या अर्थसंकल्पाची चर्चा पुकारण्यात आली मात्र गदारोळामुळे ती होवू शकली नाही अखेर पिठासीन अध्यक्ष अशोक पवार यानी दिवसभरा साठी कामकाज तहकूब केल्याची घोषणा केली.