lavni dancer auto rickshaw driver

भररस्त्यात रिक्षा ड्रायव्हरने केलेल्या लावणीमुळे (auto driver dancing on lavni)सगळेच भारावून गेले आहेत. (viral video)या रिक्षा ड्रायव्हरचे हावभाव आणि त्याच्या अदांपुढे तर भलेभले गारद पडतील. बारामतीच्या या रिक्षाचालकाचं नाव बाबाजी कांबळे असल्याची माहिती मिळत आहे.

    सोशल मीडियावर(social media) खूप वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल(viral video) होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकजण आपली कला सादर करत असतात. सध्या एका रिक्षावाल्याचा(auto driver danving on lavni) एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या रिक्षावाल्याने चक्क नटरंगमधील लावणीवर ठेका धरला आहे. मला जाऊ द्या ना घरी असे या गाण्याचे बोल आहेत.  डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या रिक्षा ड्रायव्हरला आता फिल्मची ऑफर मिळाली आहे.

    भररस्त्यात रिक्षा ड्रायव्हरने केलेल्या लावणीमुळे सगळेच भारावून गेले आहेत. या रिक्षा ड्रायव्हरचे हावभाव आणि त्याच्या अदांपुढे तर भलेभले गारद पडतील. बारामतीच्या या रिक्षाचालकाचं नाव बाबाजी कांबळे असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बाबाजी कांबळे यांना मराठी चित्रपट दिग्दर्शक घनश्याम येड यांच्याकडून चित्रपटाची ऑफर आली आहे. बाबाजी कांबळ‌ेंचा लावणी नृत्याचा व्हिडिओ महाराष्ट्र सूचना केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शेअर केला आहे. बाबाजी कांबळेंचा डान्स व्हिडिओ आत्तापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. ५ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.