बा विठ्ठला…. जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे; मनसेची खोचक टीका

आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाले होते. विषेश म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले. दरम्यान त्यावर आता मनसेने खोचक टीका केली आहे. ‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’, अशी खोचक टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

    मुंबई : रंगबेरंगी फुलांच्या सजावटीसह 10 मानाच्या पालख्या शिवशाही बसने सोमवारी पंढरपुरात दाखल झाल्या. पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाले होते. विषेश म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले.

    दरम्यान त्यावर आता मनसेने खोचक टीका केली आहे. ‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’, अशी खोचक टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

    येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याआधीच आता सर्वच पक्ष या निवडणुकीवर डोळा लावून बसले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादात मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मनसेने शिवसेनेला टाळी मागितली होती. परंतु शिवसेनेने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जायला वेळ नाही. पण बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. कोरोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला मुख्यमंत्री सर्वात पुढे असतात अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली होती. जसा बेस्ट ‘शी.एम’ चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल, अशी उपरोधक टीका देखील त्यांनी केली होती.