‘बात निकलेगी तो फिर.., आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले कि, बात 'हरामखोरीची' निघाली तर मग 'डांबराने' लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा, असे खडेबोल शिवसेनेला त्यांनी सुनावले आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केलेल्या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. तसेच आजच्या सामनाच्या अग्रलेखात महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, अशी टीका शिवसेनेनं (Shiv Sena) कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते डॉ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, बात ‘हरामखोरीची’ निघाली तर मग ‘डांबराने’ लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा, असे शिवसेनेला त्यांनी सुनावले आहे.


मुंबई साखळी बाँम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना राणावतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असे आशिष शेलारांना म्हटले आहे.

पुढे म्हणाले की, भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?

कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? अशा प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ असेही त्यांनी म्हंटले आहे.