भाजपचे ४० आमदार संपर्कात असल्याचा बच्चू कडूंचा दावा

  • महाराष्ट्रातील महाविकास आघा़डी सरकारला कसलाही धोका नाही. तसेच हे तीन पक्षीय सरकार पूर्ण काळ टीकेल आणि कामकाजही व्यवस्थित चालू आहे असे म्हणाले. कोरोना काळात सरकार जनतेच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आमचं सरकार स्थिर आहे. उलट तुमचा पक्ष अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. भाजपमधील ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या पक्षातील अस्थिरतेवर लक्ष ठेवा असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मुंबई – मुंबईत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. परंतु राजकारणातही धुसपूस सुरुच आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. त्यातच महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. तसेच त्यांच्यात संवाद नाही आणि समन्वयाचा आभाव आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. हे सरकरा लवकरच कोसळेल असेही ते म्हणाले होते. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू म्हणाले की भाजपाचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत. यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील महाविकास आघा़डी सरकारला कसलाही धोका नाही. तसेच हे तीन पक्षीय सरकार पूर्ण काळ टीकेल आणि कामकाजही व्यवस्थित चालू आहे असे म्हणाले. कोरोना काळात सरकार जनतेच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आमचं सरकार स्थिर आहे. उलट तुमचा पक्ष अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. भाजपमधील ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या पक्षातील अस्थिरतेवर लक्ष ठेवा असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे. ह्या सरकारमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही. तसेच त्यात समन्वयाचा अभाव आहे. हे सरकार पाडायची गरज नसुन ते आपणहुनच पडणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.