Bachchu Kadu warns Union ministers not to apologize
माफी मागा नाहीतर तोंड काळे करू बच्चू कडू यांचा केंद्रीय मंत्र्यांना इशारा

या शेतकर्‍यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असे विधान केंद्रीय राज्यमंत्री कटारिया यांनी केले. या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

मुंबई : प्रतिनिधी

कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीला घेराव करून बसलेल्या शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी माफी मागावी अन्यथा त्यांचे तोंड काळे करू असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकर्‍यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असे विधान केंद्रीय राज्यमंत्री कटारिया यांनी केले. या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

कटारिया यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला असून रतनलाल कटारियांनी तात्काळ या शेतकर्‍यांची माफी मागावी अन्यथा त्यांचें तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा ईशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आणि त्यांनी शेतकर्‍यांबाबत हे वक्तव्य करणे चुकीचे आहे.

तुम्ही जर शेतकर्‍यांसाठी मरायची भाषा वापरत असाल तर मग आम्ही तुम्हाला मारायसाठी यायचे का? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय. शेतकर्‍यांना त्यांच्या मागणीसाठी प्रतिसाद न देता त्यांना सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही जर मारण्याची भाषा करत असाल तर आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठे पाठवायाच हे ठरवावे लागेल, असे ते म्हणाले.

रतनलाल कटारिया यांनी आता शेतकर्‍यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही.

बच्चू कडू , राज्यमंत्री