dadar theft

रेल्वे स्टेशनच्या पुलावर झोपलेल्या इसमाची बॅग पळवणाऱ्याला(Bag Theft) मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक(Arrest) केली. या आरोपीकडून पोलिसांनी बॅगेसह २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या(Dadar Railway Station) पुलावर झोपलेल्या इसमाची बॅग पळवणाऱ्याला(Bag Theft) मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक(Arrest) केली. या आरोपीकडून पोलिसांनी बॅगेसह २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    संतोष गायकवाड (३५, रा. अकोला) हे कामानिमित्त मुंबईत आले होते. रात्री उशिरा स्थानकातील मोठ्या पुलावर ते झोपले. हीच संधी साधून चोरट्याने गायकवाड यांची बॅग पळवली. त्या बॅगेत ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदर गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांना आरोपीची मािहती प्राप्त झाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी सलीम याला अटक केली. मूकबधिर असलेल्या सलीमची चौकशी केली असता त्याने इशाऱ्यांद्वारे पळवलेल्या मुद्देमालांपैकी २ लाख १२ लाख रुपयांच्या मुद्देमालांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.

    सदर कारवाई वरिष्ठ लोहमार्ग पोलीस निरीक्षक महबुब इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. के. डोके, हवालदार पी. एस. घार्गे, एस. व्ही. बने, पोलीस नाईक टी. ए. साळुंखे, पोलीस नाईक व्ही. व्ही. जाधव, पोलीस नाईक एम. डी. पाटील, पोलीस नाईक डी. एन. पाटील, पोलीस अंमलदार वाय. एन. बच्चे, पोलीस अंमलदार एन. एच. गुरव आदी पथकाने केली.