सचिन वाझेंचा पाय खोलात, मुंबई सत्र न्यायालयाचा दणका

अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळला असून रियाझ काझी आणि सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

    मुंबई –  मुंबई सत्र न्यायालयाने निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच , एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची वाढीव मुदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    सचिन वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळला

    अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळला असून रियाझ काझी आणि सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याचप्रमाणे एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली आहे.