Rajiv bajaj

वाहिन्यांच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय आता ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी बजाज ऑटोने घेतला आहे. आणखीही काही कंपन्या या तिन्ही चॅनल्सवरील जाहिराती बंद करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे या वाहिन्यांच्या महसूलावर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी वृत्त वाहिन्यांच्या नकली टीआरपीचे (TRP scam) पितळ उघडं केले आहे. ह्या वृत्तवाहिन्या अधिकाधिक जाहिराती (advertisements) पदरी पाडून घेण्यासाठी टीआरपीचे नकली आकडे दाखवत असायचे. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्यात रिपब्लिक (Republic TV) वृत्तवाहिनीसह “फक्त मराठी” आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावे समोर आणली आहेत. त्यामुळे याचा फटका या वाहिन्यांना बसणार आहे.

वाहिन्यांच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय आता ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी बजाज ऑटोने घेतला आहे. आणखीही काही कंपन्या या तिन्ही चॅनल्सवरील जाहिराती बंद करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे या वाहिन्यांच्या महसूलावर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

सशक्त ब्रँड हा आमचा पाया आहे. त्यावर आम्ही आमचा व्यवसाय मजबूत केला आहे. केवळ भक्कम व्यवसाय हा आमचा अंतिम हेतू नाही. समाजाला आम्ही देणं लागतो. मी ‘बजाज’ च्या वतीने स्पष्ट करतो की जो ब्रँड किंवा संस्था संशयाच्या भोवऱयात आहे, त्यांच्यासोबत आमचा ब्रँड जोडला जाणार नाही, असे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले.