हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात

आज शनिवार ५ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद ( Amravati And  Aurangabad District) जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे  आज शनिवार ५ डिसेंबर २०२० रोजी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद ( Amravati And  Aurangabad District) जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

सकाळी १०.२० वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर, मौजे देऊळ गव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. तर ११.१५ वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव  करणार आहेत.

दुपारी १२.१५ वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण होणार आहेत. त्यानंतर २ वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव करणार आहेत. दुपारी ३.१० वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण होऊन ते औरंगाबाद येथे आगमन व ३.३५ वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण होणार आहेत.