बाळासाहेब थोरतांनी दिले फडणवीसांना असे प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकटात केंद्राकडून राज्य सरकारला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांना आज महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला.

पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरतांनी अनेक महत्वपर्ण मुद्यांवर आपले मत स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र काम सुरु असल्याचे थोरात यांनी सांगितले. महाराष्ट्र हे उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.   परराज्यातील कामगारांच संगोपन महाराष्ट्र सरकारकडून झालेल आहे. तसेच इथून त्यांना घरी पाठवण्याची सोय देखील आपण सोय केलेली आहे. राज्य सरकार परप्रांतीयांची व्यवस्थित सोय करत असल्याचेही थोरातांनी स्पष्ट केले. 
 मुंबईची स्थिती ही काळजीची आहे. मुंबईसाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालून उपाययोजना केलेली आहे. विरोधकांकडून सहकार्य करायच ऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे थोरातांनी सांगितले.  आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू  आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून मुक्त करणार आहोत. विरोधकांकडून सहकार्य करायच ऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे