Balasaheb-Thorat

महाराष्ट्राच्या इतिहासात हे आहे की एक संस्कृती आहे, एकामेकांचा सन्मान करण्याची विरोधी पक्षात असलात तरी. टीका हा एक अपरिहार्य भाग असतो, टीका करावी लागते, बोलावं लागतं. परंतु त्याचा स्तर कोणता असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सेना आणि भाजप एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसलं होतं. तसेच शिवसेनेने आक्रमक होऊन भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यासोबतच काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा केल्याचं निदर्शनास आलं होतं. दरम्यान, नारायण राणेंच्या अशोभनीय वक्तव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    कालची जी घटना आहे, ती आपण पाहिली तर तशी दुर्दैवी वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात हे आहे की एक संस्कृती आहे, एकामेकांचा सन्मान करण्याची विरोधी पक्षात असलात तरी. टीका हा एक अपरिहार्य भाग असतो, टीका करावी लागते, बोलावं लागतं. परंतु त्याचा स्तर कोणता असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

    पुढे त्यांनी सांगितलं की, त्यांनी जो शब्द वापरला, तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व हे मुख्यमंत्री करत असतात, तो मानबिंदू असतो, अस्मिता असते, कुणीही मुख्यमंत्री असो. त्यांच्याबाबतीत असा शब्द वापरणं तर अतिशय चुकीचं होतं. म्हणून माझ्या मते जे काही घडलंय याबाबत आम्ही निषेध करतो आहोत, असं थोरात म्हणाले.