vikhe patil book publication

ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर शेती, सिंचन, सहकार, राजकारण, मानवी मूल्य याचा मोठा संदर्भ ग्रंथ आहे. बाळासाहेब विखे- पाटील हे आयुष्यभर गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत राहिले. त्यांच कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय जवळून पाहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्या कष्टामुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे.

अहमदनरग : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं (Balasaheb Vikhe-Patil’s autobiography ‘Deh Vechava Karni’ ) प्रकाशन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील आणि अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे:

ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर शेती, सिंचन, सहकार, राजकारण, मानवी मूल्य याचा मोठा संदर्भ ग्रंथ आहे. बाळासाहेब विखे- पाटील हे आयुष्यभर गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत राहिले. त्यांच कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय जवळून पाहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्या कष्टामुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

सिंचन आणि सहकार या क्षेत्रात अतिशय मोठे काम केले. यासाठी सर्वपक्षीय नेते सोबत घेतले. प्रसंगी पक्षाचा रोष ओढवून घेतला. महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीचा ध्यास त्यांनी घेतला होता. राजकारण करताना सुद्धा समाजाचे प्रश्न सोडवण्यावर माझा नेहमी भर राहिला असे डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या आत्मकथेचे आज जरी प्रकाशन झाले असेल तरी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जीवनाच्या कथा ऐकायला मिळतात, असेही मोदी म्हणाले.