मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या आणि त्यापूर्वीच करुन घ्या महत्त्वाची कामे

पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते. तसेच इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मे महिन्यात किती दिवस बँका सुरु राहणार, किती दिवस बंद हे जाणून महत्त्वाचे आहे.

  मुंबई : कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन यासारखे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना घरात राहा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या दरम्यान काही अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे निर्बंधादरम्यान फक्त अत्यावश्यक कामांसाठी सूट देण्यात आली आहे.

  या पार्श्वभूमीवर बँकांनी डिजीटल व्यवहार करावे, असे आवाहन सर्वच बँकांनी केले आहे. त्यामुळे तुम्ही सर्व कामे डिजीटल पद्धतीने करावी, असे सांगितले आहे. मात्र पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते. तसेच इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मे महिन्यात किती दिवस बँका सुरु राहणार, किती दिवस बंद हे जाणून महत्त्वाचे आहे.

  मे महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी

  १ मे – शनिवार – महाराष्ट्र दिन / कामगार दिन
  २ मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
  ७ मे – शुक्रवार – जमात-उल-विदा (जम्मू आणि श्रीनगर)
  ८ मे – दुसरा शनिवार – आठवड्याची सुट्टी
  ९ मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
  १३ मे – गुरुवार – ईद (ईदच्या उत्सवामुळे श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका बंद राहतील.)
  १४ मे – शुक्रवार – परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.)
  १६ मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
  २२ मे – चौथा शनिवार – साप्ताहिक सुट्टी
  २३ मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
  २६ मे – गुरुवार – बुद्ध पूर्णिमा
  ३० मे – रविवार – आठवड्याची सुट्टी