Bappa Pavla! 1.40 lakh doses to Konkan people during Ganeshotsav; Positive response from the Chief Minister to the demand of Minister Uday Samant

कोकणात कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी साठी ४० हजार तर सिंधुदुर्गसाठी ६९ हजार डोस दिले आहेत.

    मुंबई : कोकणात कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेऊन मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीकरणासाठी लसींच्या अधिक डोसची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी साठी ४० हजार तर सिंधुदुर्गसाठी ६९ हजार डोस दिले आहेत.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना खास बाब म्हणून लसीचे १ लाख ४० हजार डोस दिले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोकणवासीयांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून एक कोकणवासी म्हणून कोकणातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, अशा शब्दात सामंत यांनी भावना व्यक्त केल्या.

    सदर प्राप्त डोस दोन दिवसात नागरिकांना द्यावेत, अशा सूचना सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांस दिल्या आहेत. या लसी प्राप्त होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी देखील प्रयत्न केले आहेत.