The bodies of 49 people were found in the sea 600 crew members safe Naval rescue operation begins

बार्ज पी-305 जहाज दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्ज इंजीनिअर मुस्तफिजूर रहमान यांच्या तक्रारीवरून कॅप्टन राकेश बल्लाव आणि इतरांवर कलम 304 (2), 338 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राकेश बल्लव यांनी बार्जवरील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप रहमान यांनी केला आहे.

    मुंबई : बार्ज पी-305 जहाज दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्ज इंजीनिअर मुस्तफिजूर रहमान यांच्या तक्रारीवरून कॅप्टन राकेश बल्लाव आणि इतरांवर कलम 304 (2), 338 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राकेश बल्लव यांनी बार्जवरील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप रहमान यांनी केला आहे.

    दरम्यान, चक्रीवादळात सापडलेल्या पी-305 या बार्जवरील अपघातात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी 49 मृतदेह मुंबईत आणण्यात आले असून भारतीय नौदलातर्फे अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

    यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका, एअरक्राफ्ट या अरबी समुद्रात शोधकार्य घेत असून; ग्रीन शिप सागर भूषण व सपोर्ट स्टेशन-3 या दोघांना टग बोटी द्वारे मुंबई बंदरात आणण्यात आले आहे. यापैकी सपोर्ट स्टेशन-3 यास इंदिरा डॉक या ठिकाणी ठेवण्यात आले असून, सागर भूषण या जहाजास मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.