आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नका, एकच थापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही

बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

    भाजपाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. भाजपाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीकास्त्र डागलं. शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. “आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

    मुंबईतील ऐतिहासिक वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा आज शुभारंभ आहे. सरकारकडून पुनर्विकास करण्यात येणारा हा मोठा प्रकल्प आहे. बीडीडी चाळीतील जांभोरी मैदान परिसराला एखाद्या छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत तिन्ही पक्षाचे झेंडे लावून बॅनरने, फुलांनी हा परिसरात सजवण्यात आलाय. भव्य असा पेंडॉल तयार करण्यात आलाय. धुराची फवारणी केली जातेय. बॅनरवर विकासाचा आराखडा कसा असेल त्याची छायचित्रही लावण्यात आलीयेत. बीडीडी चाळीतील जे कुटूंब अपात्र ठरलेयत त्यांनी या प्रकल्पाला विरोध केलाय, त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घटू नये यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवण्यात आलीये.

    बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.

    “सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.