Changes to the BDD redevelopment plan; A 40 storey building will be erected

बीडीडी चाळींतील(BDD Chawl) रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकल्प मुंबईकरांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

    मुंबई: बीडीडी चाळींच्या(BDD Chawl) पुनर्विकासाचा(Redevelopment) मुद्दा अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. कॉर्पस फंड, पार्किंग सुविधा, पुनर्विकासाच्या कराराचे स्वरुप अशा अनेक मागण्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामध्ये अडथळा ठरत होत्या. चाळींतील रहिवासी आपल्या मागण्या समाधानकारकरित्या हाताळल्या जाव्यात यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. मात्र गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्या प्रयत्नांतून सरकार व रहिवाशांमधील सकारात्मक समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लागून रहिवाशांचे घरांचे स्वप्न(Dream Of Home) साकारले जात आहे. त्यामुळे बीडीडी चाळींतील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकल्प मुंबईकरांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

    ‘समन्वयातून समाधान’ या तत्वाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून हा प्रकल्प गतिमान करत, विक्रमी वेळेत प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला आहे. यासंदर्भात वेळोवेळी चाळींतील रहिवाशांच्या गाठीभेटी घेत त्यांना विश्वास दिला. आपल्या मंत्रालयीन सहकाऱ्यांच्या मदतीने कायद्यांच्या चौकटीत तोडगे काढत व विकासकांना त्यानुसार आदेश देत आव्हाड यांनी रहिवाशांच्या मागण्या पूर्ण केल्या. त्यामुळेच ना. म. जोशी मार्गावरील पहिल्या टप्प्यातील १० चाळींचा पुनर्विकास होऊ घातला आहे. प्रकल्पासाठी रहिवाशांना एकत्र आणणे, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करणे, भविष्यातील सोयीसुविधांचा आराखडा तयार करणे, इत्यादी गोष्टींसाठी विविध यंत्रणांनी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग काढला. सरकारी यंत्रणा, खासगी विकासक आणि रहिवाशी यांच्या एकत्रित हिताला पूरक अशारितीने हा प्रकल्प जलद गतीने पूर्णत्वास नेण्याचा मानस आव्हाड यांनी रहिवाशांजवळ व्यक्त केला आहे.

    ‘समन्वय’, ‘सामंजस्य’ आणि ‘सहकार्य’ या त्रिसूत्रीवर भर देत आव्हाड यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले. आव्हाड यांनी घालून दिलेल्या पुनर्विकासाच्या प्रारूपापासून बोध घेऊन मुंबईमध्ये होऊ घातलेल्या अनेक इमारतींच्या पुनर्विकासासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, अशी आशा रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.