काळजी घ्या अन् सतर्क राहा : कोरोना आपले रंग उधळतोय, राज्यात ५६,२८६ नवीन रुग्णांची नोंद, ३७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद; दुसऱ्या दिवशीही मृत्यु संख्येत वाढ

गुरुवारी ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : गुरुवारी राज्यात ५६,२८६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर आज ३७६ काेराेनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. बुधवारी राज्यात काेराेनाबाधित मृत्युसंख्येत सहा महिन्यानंतर वाढ झाल्याचे समाेर आले तर गुरुवारी देखील मृत्युसंख्येत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मृत्युची संख्या वाढल्याने आराेग्य विभाग अधिकच सतर्क झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.७७ एवढा आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२,२९,५४७ झाली आहे.

    गुरुवारी ३६,१३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज ३७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३७६ मृत्यूुपैकी १३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३० मृत्यू पालघर-२२, पुणे-१८, साेलापूर-१५, नागपूर-१२, नांदेड-११, नाशिक-११, परभणी-८ धुळे-७, ठाणे-६, अमरावती-५, सांगली-४, औरंगाबाद-३, अहमदनगर-२, जालना-२, सातारा-२, रत्नागिरी-१ जम्मू-काश्मीर -१ असे आहेत.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती हाेम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २२,६६१ व्यक्ती संस्थ‌ात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत ८९३८ नवे रूग्ण

    दरम्यान मुंबईत दिवसभरात ८९३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४९१९८० एवढी झाली आहे. तर आज २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११८८१ मृत्यूची नोंद करण्यात आली.