काळजी घ्या! अन्यथा…मुंबईत साथीच्या आजारांमध्ये होतेय वाढ

जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या ११ दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११ जुलैपर्यंत मुंबईमध्ये मलेरियाचे २३०, लेप्टोचे १५, डेंग्यू ८, गॅस्ट्रो १०६, हेपेटायटीस १२, एच1एन1 चे १२ रुग्ण सापडले आहेत. अवघ्या ११ दिवसांमध्ये जूनच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे.

  मुंबई: पावसाळा सुरू झाल्याने मुंबईमध्ये काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो आणि हेपेटायटीसचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. साथीच्या आजारांची लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे यात साम्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

  तौक्ते वादळानंतर मुंबईत प्रचंड वाढलेला उकाडा आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे मुंबईमध्ये जूनपासून साथीच्या आजारांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जूनमध्ये मुंबईमध्ये मलेरियाच्या ३५७ रुग्ण सापडले होते. तसेच लेप्टो १५, डेंग्यू १२, गॅस्ट्रो १८०, हेपेटायटीस १९ आणि एच1एन1 चे सहा रुग्ण सापडले होते.

  जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या ११ दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने या आजारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११ जुलैपर्यंत मुंबईमध्ये मलेरियाचे २३०, लेप्टोचे १५, डेंग्यू ८, गॅस्ट्रो १०६, हेपेटायटीस १२, एच1एन1 चे १२ रुग्ण सापडले आहेत. अवघ्या ११ दिवसांमध्ये जूनच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे.

  शहरातील साथीच्या आजारात होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र असे असले तरी कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने अनेक रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने अनेकजण रुग्णालयात न जाता घरच्या घरीच उपचार करत असल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

  तुम्हाला या बातमीविषयी काय वाटते? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा.

  Be careful Otherwise there is an increase in epidemic diseases in Mumbai nrvb