मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्याला यश आले आहे. लॉकडाऊन, नाईटची गरज नाही. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, नवीन वर्षाचे स्वागत करताना सावध राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई (Mumbai).  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्याला यश आले आहे. लॉकडाऊन, नाईटची गरज नाही. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, नवीन वर्षाचे स्वागत करताना सावध राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

काय करायला हवे ते आपण अनुभवातून शिकलो आहोत. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणे कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. कोविड सुरू झाला तेव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

देशाचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, लस आली तरी मास्क लावावा लागेल. माझ्या मते सहा महिने तरी मास्क लावावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले. त्यामुळे सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

युरोप, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. पाश्चिमात्य देशांत कोरोना विषाणूचे स्वरुप बदललं आहे. हा नवा विषाणू कोरोनापेक्षा अधिक वेगाने पसरू शकेल हीच तिथे भीती आहे. आता नवीन वर्षाच्या दरम्यान पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू करणार का असे अनेक प्रश्न मला विचारण्यात येत आहेत. पण मला नाही वाटत राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी व लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. आपण अनेक गोष्टी आता अनुभवातून शिकतोय,’ असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

नाईट कर्फ्यु कायद्याने लावू शकतो
नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण त्याची गरज नाही. सूचनांचे पालन ७०-७५ टक्के लोक करत आहेत. मात्र उर्वरित जे लोक सूचनांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यामुळे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परत कसे थांबवायचे? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.