मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण, भाजपचा दुतोंडी चेहरा; नवाब मलिकांची टीका

भाजपची आरक्षणाविरोधात वेगळी विचारधारा आहे, एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा भाजप नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात, अशी घणाघाती टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा तिढा आणखी गुतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार हा प्रश्न केंद्र सरकारच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न चांगलाच पेटलेला दिसत आहे. भाजप खासदार संभाजीराजे यावरून राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीका सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

    नवाब मलिक काय म्हणाले ?

    भाजपची आरक्षणाविरोधात वेगळी विचारधारा आहे, एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा भाजप नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात, अशी घणाघाती टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तसेचं मंडल आयोग आल्यानंतर भाजपने त्याला विरोध केला ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवतात, तर कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात, असं नवाब मलिक म्हणाले.

    दरम्यान, भाजपने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. परंतू त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे. 1990 साली मंडल आयोगाने मांडलेल्या शिफारसीवर भाजपने विरोध केला होता, हाच मुद्दा मलिक यांनी बोलुन दाखवत भाजपवर टीका केली आहे.