कोरोनाला रोखण्यासाठी धडक कारवाई ; सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २८ लाख ६७ हजारांची दंड वसुली

आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेने रुपये २०० एवढा दंड सध्या आकारला जात आहे.

  मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून २८ लाख ६७ हजारांची दंड वसुली करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

  आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेने रुपये २०० एवढा दंड सध्या आकारला जात आहे.

  मात्र, या रकमेत वाढ करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे. ही रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

  सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे ७ महिन्यात १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये २८ लाख ६७ हजार ९०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

  विभाग दंड रुपयात : 

  कुलाबा ३,२९,८००/-

  डोंगरी १,९५,६००/-

  चंदनवाडी २,७१,४००/-

  ग्रँटरोड १,२५,०००/-

  ·भायखळा २०,०००/-

  परळ २,१७,४००/-

  माटुंगा ५०,६००/-

  एल्फिन्स्टन २६,०००/-

  दादर २५,९००/-

  वांद्रे पूर्व १,७१,४००/-

  वांद्रे पश्चिम २५,८००/-

  ·अंधेरी पूर्व २७,०००/-

  अंधेरी पश्चिम ९५,६००/-

  मालाड ६९,८००/-

  कांदिवली २,६१,४००/-

  बोरिवली ३३,५००/-

  गोरेगाव ४३,८००/-

  दहिसर १,०८,४००/-

  कुर्ला ४,७०,२००/-

  चेंबूर १९,२००/-

  गोवंडी १,०६,८००/-

  घाटकोपर ७१,३००/-

  भांडुप ९०,४००/-

  मुलुंड ११,६००/-