automatic door double decker buses available in best for mumbaikers

बेस्ट(best) उपक्रमाने स्थायी समितीला सादर केलेला १८८७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प(budget) स्थायी समितीने बेस्ट उपक्रमाला पाठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बेस्टची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : बेस्ट(best) उपक्रमाने स्थायी समितीला सादर केलेला १८८७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प(budget) स्थायी समितीने बेस्ट उपक्रमाला पाठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बेस्टची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमांचा २०२१ – २२ या आगामी वर्षाकरिता ३५३२.३० कोटी विद्युत पुरवठा विभागाच्या उत्पन्न आणि ३७९५.८९ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने मंजुर करुन स्थायी समितीला सादर केला. विद्युत पुरवठा विभागात २६३. ५९ कोटींची तर वाहतूक विभागात १५२४.२४ कोटींची तूट दर्शवली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढणाऱ्या बेस्ट उपक्रमाचा तोट्यावर स्थायी समितीत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. पालिकेने अनुदान दिल्यानंतरही बेस्टची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. अशा स्थितीत आता विद्युत पुरवठा विभागालाही तोटा होऊ लागला आहे. त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

बेस्ट उपक्रम वाचविण्यासाठी कोणत्या उपाययेजना करणार अशी विचारणा सदस्यांनी केली. अखेर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थसंकल्प फेरविचारार्थ बेस्ट उपक्रमाकडे पाठविण्याची उपसूचना मांडली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही उपसूचना मंजूर करीत बेस्टचा अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाला फेरविचारार्थ परत पाठविण्याचे आदेश दिले. त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प आता शिलकीचा अर्थसंकल्प दाखवून पुन्हा स्थायी समितीला सादर करावा लागणार आहे.