automatic door double decker buses available in best for mumbaikers

कोरोना काळात 'बेस्ट'ने फुकट्या प्रवाशांकडून १३ लाखांचा दंड वसूल(13 lakh Fine Collected From Without Ticket Travelers) केला आहे.

    मुंबई : कोरोना संकटात(Corona Period) जीवाची बाजी लावत बेस्ट उपक्रमाचे चालक व वाहक आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत बेस्टला फुकट्या प्रवाशांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. कोरोना काळात ‘बेस्ट’ने फुकट्या प्रवाशांकडून १३ लाखांचा दंड वसूल(13 lakh Fine Collected From Without Ticket Travelers) केला आहे.

    जानेवारी २०२० ते मे २०२१ पर्यंत तब्बल २० हजार २३४ फुकटया प्रवाशांनी प्रवास केल्याने त्यांच्याकडून १३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक गणित बिघडले असून बेस्ट उपक्रमालाही आर्थिक फटका बसला आहे. तरीही कोरोना संकटात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना इच्छीत स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रमाचे वाहक व चालक पार पाडत आहेत. त्यात मुंबई उपनगरीय लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने प्रवाशांचा भार बेस्ट बसेसवर येत आहे. त्याचाच फायदा घेत फुकट्या प्रवाशांचे फावते आहे.

    बेस्ट बसगाडयांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत जानेवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत एकूण २०,२३४ प्रवासी विना तिकीट आढळले असून त्यांच्याकडून १३लाख २ हजार ३३४ एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली.

    बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकास बंधनकारक असून विना तिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा देखील आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्याकरता योग्य तिकीट अथवा वैध बसपास घेऊन, तिकीट व बसपासावर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा,असे आवाहन बेस्ट उपक्रमांतर्फे करण्यात आले आहे.