बेस्टचा तिसरा वाहक झाला कोरोनामुक्त

मुंबई :संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने घाबरून सोडले आहे.मुंबईतील अत्यावश्यक सेवा बजावणारेही त्याच्या विळख्यात आहेत. बेस्ट उपक्रमातील गोरेगाव आगारातील तिसऱ्या बस वाहकाने कोरोनावर विजय मिळवला

 मुंबई : संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने घाबरून सोडले आहे.मुंबईतील अत्यावश्यक सेवा बजावणारेही त्याच्या विळख्यात आहेत. बेस्ट उपक्रमातील गोरेगाव आगारातील तिसऱ्या बस वाहकाने कोरोनावर विजय मिळवला आहे. मीरा रोड येथील तांबे रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. यापूर्वी गोरेगाव आगाराचेच बस वाहक कोरोना पॉझिटिव्ह होते.त्यांना १३ एप्रिल रोजी मीरा रोड येथे एका रुग्णालयात दाखल झाले होते. ते बरे झाल्यानंतर त्यांना  एप्रिल घरी सोडण्यात आले. जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित बस वाहकांवर उपचार सुरू होते ते देखील कोरोनामुक्त झाले.त्यांना देखील घरी पाठविण्यात आले होते.

 बेस्ट उपक्रमाचा तिसरा कोरोना योद्धाही गोरेगाव आगारामध्ये बस वाहक म्हणून  कार्यरत होता. १८एप्रिल पासून मीरा रोडच्या तांबे हॉस्पिटल येथे दाखल होता. मीरा रोड मध्येच राहणाऱ्या  या बसवाहकाला दम्याचाही त्रास होता असे असूनही त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना १८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते.त्यांनी कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यात यश मिळवले त्यामुळे त्यांना  हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, बेस्ट उपक्रमातील एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी तिघांनी कोरोनावर मात करून पुन्हा आपले घर गाठले.तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अजून ११ बेस्ट कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.