प्रशासनाला ‘बेस्ट’ दिलासा;  बेस्टमधील ९६ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त

राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून बेस्ट सेवा कार्यरत आहे. लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्याने बेस्ट उपक्रमावर सार्वजनिक वाहतुकीचा भार होता. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना वेळेत सोडण्याची जबाबदारी बेस्टने समर्थपणे पार पाडली आहे. मागील वर्षीच्या मार्चमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर बेस्टमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागण झाली.

    मुंबई : कोरोनाच्या संकटात सेवा देत असताना बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा बसलेला विळखा आता सैल झाला आहे. आतापर्यंत २९५८ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला असून यातील २८३४ जण म्हणजे ९६ टक्के कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या २१ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील एकजण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

    राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून बेस्ट सेवा कार्यरत आहे. लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्याने बेस्ट उपक्रमावर सार्वजनिक वाहतुकीचा भार होता. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना वेळेत सोडण्याची जबाबदारी बेस्टने समर्थपणे पार पाडली आहे. मागील वर्षीच्या मार्चमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर बेस्टमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागण झाली.

    आतापर्यंत तब्बल २९५८ कामगारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यातील २८३४ कर्मचारी बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या २१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकजण वेंटिलिटरवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    दरम्यान, सेवा देताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बेस्टमधील काही कर्मचाऱ्यांना जीवही गमवावा लागला आहे. यातील ५५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात आली आहे. तर ७० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाची आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.