रक्षाबंधन निमित्त ‘बेस्ट’ सोय; मुंबईत दिवसभर धावणार जादा बसेस

गेल्या दीड वर्षापासून मुंबईकर कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंधांत शिथीलता देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोरोनाचा धोका काय़म असल्याने राज्य सरकारने सण साजरा करण्यावर मर्यादा आणली आहे. येत्या रविवारी, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असल्याने बेस्ट जादा बसेस सोडणार आहे.

    मुंबई : रविवार, २२ ऑगस्टला रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने २२१ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारातून या बसेस विविध मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत बेस्ट बसने प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

    गेल्या दीड वर्षापासून मुंबईकर कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंधांत शिथीलता देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोरोनाचा धोका काय़म असल्याने राज्य सरकारने सण साजरा करण्यावर मर्यादा आणली आहे. येत्या रविवारी, २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असल्याने बेस्ट जादा बसेस सोडणार आहे.

    रेल्वेने प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय मासिक पास असलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दिवशी अनेक प्रवाशांना बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या दिवशी बेस्टने जादा बसेस सोडण्य़ाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.