best mini bus accident

बेस्टची मिनीबस भांडुपवरुन वरळीला जात असताना हा अचानक अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बसमध्ये २० ते २५ प्रवाशी होते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे एक बाईकस्वार बसच्या समोर आला. या बाईकस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस दुभाजकावर एवढ्या जोरात आपटली की बसची एक बाजू चेपली गेली आहे.

विक्रोळी : विक्रोळीतील (Vikhroli Highway) पूर्व द्रुतगती मार्गावर शनिवारी बेस्टच्या मिनी (Best Mini Bus) बसचा अपघात (Accident) झाला. या अपघातात बसमधील १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमधील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर सध्या राजावाडी आणि विक्रोळीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बेस्टची मिनीबस भांडुपवरुन वरळीला जात असताना हा अचानक अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बसमध्ये २० ते २५ प्रवाशी होते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे एक बाईकस्वार बसच्या समोर आला. या बाईकस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस दुभाजकावर एवढ्या जोरात आपटली की बसची एक बाजू चेपली गेली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमींना रुग्णालयात पाठविले. अपघाताबद्दल अधित तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे. कोरोनामुळे सध्या मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सामान्य लोकांसाठी बंद आहे. केवळ डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे सर्व वाहतुकीचा सर्व भार बेस्ट सेवेवर आला आहे.