मुंबईतील बेस्टची सेवा
मुंबईतील बेस्टची सेवा

मुंबई (Mumbai) : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहनचे (BEST) महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी शनिवारी बेस्टचे २०२१-११ या आर्थिक वर्षाचे अनुमानित बजेट सादर केले. बेस्ट उपक्रम हा १८८७.८३ कोटी रुपयांच्या तोट्यात राहील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. बेस्टच्या विद्युत विभाग जो आत्तापर्यंत १०० कोटींच्या नफ्यात असे, त्या विभागातही यंदा २६३.५९ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरेंद्र बागडे यांनी या वर्षीचे बजेट बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्याकडे सादर केले.

  • विद्युत विभागही २६३ कोटींच्या तोट्यात

जरी बेस्ट सेवा १८८७ कोटी रुपयांच्या तोट्यात असली, तरी महाव्यवस्थापकांनी मुंबईकरांना अधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी ४४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबईकरांसाठी नव्या बसेस खरेदी करण्याचा इरादा वक्त करण्यात आला आहे. तर विद्युत विभागातर्फे नवे इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

विद्युत विभागात उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त
बेस्टच्या विद्युत विभागात २०२१-२२ या वर्षांत एकूण ३५३२.३० कोटी रुपये उत्पन्न होण्याचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. तर ३७९५.८९ कोटी रुपये खर्चाच्या रकान्यात दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे बेस्टचा विद्युत विभाग २६३ कोटी रुपयांच्या तोट्यात राहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परिवहन विभागात एकूण उत्पन्न १४०७ कोटी रुपये, तर खर्चाच्या रकान्यात ३०३१.२४ कोटी रुपये दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे बेस्टचा परिवहन विभाग १६२४ कोटी रुपये तोट्यात राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बेस्ट बसची संख्या वाढविणार
ऑक्टोबर २०२० पर्यंत बेस्टच्या परिवहन विभागाकडे एकूण ३८७५ बस आहेत. त्यापैकी १०९९ बस या भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिककवर चालणाऱ्या ३०० बस खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने केला आहे. पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी इलेक्टिक बसचा उपयोग होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएनजीवर चालणाऱ्या ६०० बस खरेदी करण्याची प्रस्तावित योजना आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात एकून ६३३७ बस असतील असा दावा करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम अधिक हायटेक करण्याची योजना आखण्यात आली आहे.