प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

बेस्ट बसमध्ये महिलांच्या राखीव आसनांवर(Reserved Seats For Women) बसल्यास पुरुषांवर आता शिक्षेची कारवाई(Action On Men Sitting On Seats Reserved For Women) होणार आहे. तसा निर्णय बेस्ट(Decision By Best) प्रशासनाने घेतला आहे.

    मुंबई : बेस्ट(best) उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये महिलांच्या राखीव आसनांवर(Reserved Seats For Women) बसल्यास पुरुषांवर आता शिक्षेची कारवाई(Action On Men Sitting On Seats Reserved For Women) होणार आहे. तसा निर्णय बेस्ट(Decision By Best) प्रशासनाने घेतला आहे.महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकरता काही आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. परंतु सध्या महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या आसनांवर पुरुष प्रवासी बसत असल्याने महिला प्रवाशांना राखीव आसने उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी उपक्रमाकडे आल्या आहेत. महिलांच्या आसनावर पुरुषांनी बसल्यास त्यांच्यावर कारवाई होवू शकते. त्यामुळे त्यांनी महिलांना राखीव आसने रिक्त करून द्यावीत अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

    बेस्ट बसमध्ये महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवलेल्या आसनांवर पुरुष प्रवासी बसणार नाहीत. याची वाहकांनी खबरदारी घ्यावी आणि राखीव आसनावर पुरुष प्रवासी बसलेले आढळल्यास आसन रिक्त करुन देण्याची त्यांना विनंती करावी. महिलांसाठी राखीव असलेल्या आसनांवर पुरुष प्रवासी बसल्यास आणि राखीव आसन महिला प्रवाशांना उपलब्ध करुन देत नसल्यास, अशा व्यक्तीला दोषी ठरवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ (नियम १०२) मध्ये आहे.

    सर्व बस वाहकांनी महिलांसाठी राखीव ठेवलेली आसने नियमितपणे महिला प्रवाशांनाच उपलब्ध होतील, याची काळजी घ्यावी. महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आसनांबरोबरच इतर आसनांवर देखील महिला प्रवासी बसू शकतात असे मुख्य व्यवस्थापक आर .वी.शेट्टी (वाहतूक)यांनी म्हटले आहे. वाहतूक अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी या सूचना सर्व बसवाहकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व या सूचनेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. याची खात्री करावी असे देखील त्यांनी म्हटले असून जर कोणी याचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई होवू शकते असे प्रशासनाने म्हटले आहे.