बेस्टचे ड्रायव्हर आता प्रायव्हेट वाहनेही चालवणार; बेस्ट महाव्यवस्थापकांनी घेतला मोठा निर्णय

बेस्ट उपक्रमातील चालकांना काम नसेल त्यावेळी त्यांनी सरकारी व खासगी सेवा देता येणार आहे. अशा आस्थापनांना चालकांची गरज भासल्यास बेस्ट उपक्रम उपलब्ध करुन देणार आहे. चालकांचा सराव होत राहिल आणि बेस्ट चालकांच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाला महसूल मिळण्याचे स्तोत्र निर्माण होईल, अशी मागिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र( Best General Manager lokesh chandra) यांनी दिली.

    मुंबई : बेस्ट उपक्रमातील चालकांना काम नसेल त्यावेळी त्यांनी सरकारी व खासगी सेवा देता येणार आहे. अशा आस्थापनांना चालकांची गरज भासल्यास बेस्ट उपक्रम उपलब्ध करुन देणार आहे. चालकांचा सराव होत राहिल आणि बेस्ट चालकांच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाला महसूल मिळण्याचे स्तोत्र निर्माण होईल, अशी मागिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र( Best General Manager lokesh chandra) यांनी दिली.

    बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात भाडेतत्त्वावरील बसेस दाखल होत आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील १,४२६ बसेस आहेत. या बसेसवर संपूर्ण नियंत्रण बेस्ट उपक्रमाचे आहे. परंतु या बसेसवर चालक कंत्राटदाराचाच आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे १,२०० चालकांना सध्या काही काम उपलब्ध नाही. बेस्टच्या चालकांना काम नसले तरी १,२०० चालकांना दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते.

    या १,२०० चालकांना काम नसल्याने त्यांचे बस चालवण्याचे कौशल्य खंडित होऊ नये म्हणून सरकारी, शासकीय प्राधिकरण व खाजगी अस्थापनांना चालक उपलब्ध करुन देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यामुळे चालकांचा सराव सुरु राहील व बेस्ट उपक्रमाला महसूल मिळेल, असे चंद्र यांनी सांगितले.

    कर्मचारी संघटनांचा विरोध

    बेस्ट उपक्रमातील चालकांना काम नसेल तेव्हा खासगी व सरकारी सेवा देण्याच्या निर्णयाला संघटनांनी विरोध केला आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णया विरोधात कामगारांनी आंदोलनाची हाक दिली असून येत्या मंगळवारी, १२ ऑक्टोबर रोजी परिवहन विभागाच्या प्रत्येक बस आगारात निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल, अशी माहिती बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शंशाक राव यांनी दिली.