बेवड्या नवऱ्याची कमाल, नवरीसोबत असताना केलं ‘असं’ काम, सोशल मीडियावर झाला धिंगाणा

लग्न समारंभात नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताना नवऱ्या मुलाने चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा हा दारूच्या नशेत दिसतो आहे. त्याला आपल्या समोर कोण उभं आहे, हे समजत नाही. आपल्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात वरमाला टाकताना तो चांगलाच गोंधळला आहे. याच कारणामुळे त्याने बायको समजून बाजूला उभी असलेल्या मुलीच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. दारुच्या नशेत असल्यामुळे नवऱ्या मुलाकडून ही चूक झाल्याचे समजते.

    मुंबई : सोशल मिडीयावर दररोज नवनवीन घटड असतं. रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओ तर एवढे मजेदार असतात की ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक धम्माल उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरदेवाने अजब प्रकार केला आहे.

    व्हिडीओमध्ये काय आहे ?

    दरम्यान सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लग्न समारंभातील आहे. लग्न समारंभात नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताना नवऱ्या मुलाने चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा हा दारूच्या नशेत दिसतो आहे. त्याला आपल्या समोर कोण उभं आहे, हे समजत नाही. आपल्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात वरमाला टाकताना तो चांगलाच गोंधळला आहे. याच कारणामुळे त्याने बायको समजून बाजूला उभी असलेल्या मुलीच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. दारुच्या नशेत असल्यामुळे नवऱ्या मुलाकडून ही चूक झाल्याचे समजते.

    बाजूची मुलगी भडकली

    हा प्रकार घडल्यामुळे बाजूला उभी असलेली मुलगी नवऱ्या मुलावर चांगलीच भडकली आहे. नवरदेवाने घातलेली वरमाला या मुलीने काढून थेट फेकून दिली आहे. त्यानंतर नवऱ्या मुलाच्या मित्रांनी पुन्हा एकदा नवरदेवाजवळ वरमाला देत ती खऱ्या नवरीच्या गळ्यात टाकण्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ नैसर्गिक नसून त्याला मुद्दामहून शूट केलेले असावे असा अंदाज अनेकजण बांधत आहेत. मात्र, या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.