bhabha hospital

वांद्रेतील भाभा रुग्णालयाची तळमजली व बहुमजली इमारत आहे. यातील तळमजली इमारत पाडून विस्तारीकरण(Bhaba Hospital Renovation and Expansion) केले जाणार आहे.

    मुंबई: वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे(Bhaba Hospital) विस्तारीकरण आणि नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या जागेवर असलेली तळमजली इमारत पाडून तेथे १२ बहुमजली इमारत उभी केली जाणार आहे. शिवाय सध्या असलेल्या बहुमजली इमारतीचे नुतनीकरण केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

    वांद्रेतील भाभा रुग्णालयाची तळमजली व बहुमजली इमारत आहे. यातील तळमजली इमारत पाडून विस्तारीकरण(Bhaba Hospital Renovation and Expansion) केले जाणार आहे. दोन बेसमेंट व तळमजलासह १२ मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच तेथील जुने मुख्य रुग्णालय असलेल्या १० मजली इमारचीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

    हे रुग्णालय ४९७ खाटांचे आहे. या इमारतींच्या कामाचे आराखडे, संरचनात्मक नकाशे, यांत्रिकी कामाचे अंदाजपत्रक प्रकल्प सल्लागाराने तयार केले आहे. यापूर्वी संपूर्ण कामाचा खर्च २८७ कोटी ९३ लाख ५४६ रुपये इतका होता. त्यात आता १४ कोटी ९० लाख ९२ हजार ८२६ रुपये अतिरिक्त रक्कम वाढल्याने एकूण कंत्राटाची रक्कम ३०१ कोटी ९१ लाख ८६ हजार रुपये इतका झाला आहे.

    मे. क्वालिटी हाईटकॉन प्रा.लि. या कंत्राटदाराला हे काम दिले असून अतिरिक्त १४ कोटी ९० लाख ८२६ रुपये मोजले जाणार आहेत. इमारतीचे आराखडे व संरचनात्मक नकाशे बनवण्यासाठी सल्लागार मे. स्कायलाईन आर्किटेक्टस यांनी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.