bhai jagtap

शिवसेनेने नुकताच एक मेळावा घेवून जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा देत गुजराती भाषकांना आपलेसे करण्यासाठी हाक दिली आहे. त्यापाठोपाठ आता उत्तर भारतीय  आणि गुजराती मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काँग्रेसने त्यांना जवळ करण्याची योजना आखली आहे. उत्तरभाषिक आणि गुजराती नेत्यांची घरवापसी करण्याची मोहीम मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आखली आहे.

मुंबई : शिवसेनेने नुकताच एक मेळावा घेवून जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा देत गुजराती भाषकांना आपलेसे करण्यासाठी हाक दिली आहे. त्यापाठोपाठ आता उत्तर भारतीय  आणि गुजराती मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काँग्रेसने त्यांना जवळ करण्याची योजना आखली आहे. उत्तरभाषिक आणि गुजराती नेत्यांची घरवापसी करण्याची मोहीम मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आखली आहे.

मराठी भाषिकांच्या मतांवर शिवसेना आणि मनसे अधिक मजबूत पकड ठेवून आहे. त्यामुळे मुंबई आणि लगतच्या शहरांमधिल मराठी भाषिकांव्यतीरिक्त असलेल्या इतर भाषिक मतदारांवर काँग्रेसची खरी भिस्त आहे. उत्तर भारतीय, झोपडपट्टीवासीय हे काँग्रेसचे मुंबईत पारंपारिक मतदार होते. परंतु 2014च्या निवडणुकीपासून हे पारंपारिक मतदार भाजपकडे वळले. परिणामी काँग्रेसची मुंबईत पिछेहाट झाली.

काँग्रेसचे हक्काची मतपेढी भाजपकडे वळली. गुजराती भाषिक मतदारांनीही काँग्रेसकडे पाठ फिरवली. काँग्रेसची मदार ही हिंदी आणि उत्तरभाषिक तसेच अल्पसंख्याक मतदारांवर आहे. म्हणूनच उत्तर भारतीय तसेच झोपडपट्टीवासियांची पारंपारिक मते पुन्हा काँग्रेसला मिळावीत यासाठी आपण प्रयत्न करणआर असल्याचे भाई जगताप यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून जगताप कामाला लागले आहेत. पुढील वर्षी होणार्‍या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. उत्तर भारतीय ही काँग्रेसची पारंपारिक मतपेढी. मुंबईतील उत्तर भारतीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्ष सोडून गेलेल्या उत्तर भारतीय समाजातील नेत्यांना पुन्हा पक्षात दाखल करून घेण्यात येणार आहे. काही नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची इच्छाही प्रदर्शित केल्याचे जगताप यांनी सांगितले.

मुंबईतील ८० लाखांपेक्षा जास्त असलेल्या झोपडीवासीयांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसपक्ष दक्ष राहील, अशी ग्वाही जगताप यांनी यावेळी दिली. त्यांच्या घरांचा प्रश्‍न, स्वच्छ पाणीपुरवठा, त्यांचा रोजगार आणि त्यांचे आरोग्य याचे संरक्षण कसे होईल याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत असून ५०० चौरस फुटापर्यंतच्या खोल्यांना मुंबई महापालिकेने कर लादू नये हा प्रश्‍नही आपण लावून धरणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.