कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीने भांडूप हादरले; दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू

भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये (Bhandup Dream Mall Fire) तिसऱ्या मजल्यावर स्थित सनराइझ कोविड रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भीषण स्वरूपाच्या लागलेल्या या आगीत एकूण ७६ कोरोना संक्रमित उपचार घेत होते. आगीत दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

    मुंबई: राज्यात कोरोनाचाकहर थोपवण्यासाठी रुग्णालये प्रयत्न करत असताना महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना मुंबईतील भांडूप परिसरात घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये (Bhandup Dream Mall Fire) तिसऱ्या मजल्यावर स्थित सनराइझ कोविड रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भीषण स्वरूपाच्या लागलेल्या या आगीत एकूण ७६ कोरोना संक्रमित उपचार घेत होते. आगीत दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे,  घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर धाव घेत आग विझवण्याचे कामा हाती घेतले. जवळपास २२ अग्नीशामक बंबाच्या मदतीने रुग्णालयाला लागलेली आग विझवण्यात आली आहे. दरम्यान रुग्णांना मुंलुंड याठिकाणी असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. यावेळी काही स्थानिक, रुग्णालयातील स्टाफ यांनी देखील बचावकार्यात मदत केली.