आधीच पावसाचा कहर त्यात पाणी गढूळलं, महानगर पालिका जागी होताच म्हणते कशी, “मुंबईकरांनो पाणी उकळून प्या”

जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुरु होताच भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

    भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होत आहेत. उदंचन केंद्रातील यंत्रणा सुरळीत होत असल्यामुळे आता मुंबईमधील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात आला आहे.

    शनिवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाचे पाणी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. बहुतांश भागांमध्ये १८ जुलै रोजी सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता.

    जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुरु होताच भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

    दरम्यान, भांडुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होऊन पाणीपुरवठा पूर्वपदावर येतो आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळावे आणि नंतरच प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.