भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचा पायाभरणी सोहळा आज शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पार पडणार होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार होता. परंतु एमएमआरडीएकडून (MMRDA) आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

 मुंबई : दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचा पायाभरणी सोहळा आज शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पार पडणार होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार होता. परंतु एमएमआरडीएकडून (MMRDA) आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या सगळ्या गोंधळासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे.

या कार्यक्रमाला केवळ १६ जणचं निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे. सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे आज सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.